कसबा बीड/प्रतिनिधी
करवीर पश्चिम भागात गेले तीन दिवस पावसाचा जोर वाढल्याने कोगे व बहिरेश्वर बंधारा पाण्याखाली गेला आहे. मृग नक्षत्रावर पावसाने सुरुवात केल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. त्याबरोबरच पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे नदीकाठच्या पिकांना धोका निर्माण झाला. जोरदार होणारा पाऊस व राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, यामुळे कोगे जुना पूल व बहिरेश्वर बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोगे, बहिरेश्वर, म्हारूळ, या गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तर कोगे – कुडित्रे पर्यायी मार्ग म्हणून नवीन पुल वाहतुकीसाठी खुला आहे. बहिरेश्वर, म्हारूळ या गावातील नागरिकांसाठी बीड मार्गे यावे लागत आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिला तर, बीड व नवीन कोगे पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे.








