प्रतिनिधी / चुये
कोल्हापूर शहरामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे. करवीर तालुक्यातील पंधरा गावात आज कोरोनाचा प्रवेश झाल्याने तब्बल 27 रुग्ण कोरोना बाधित झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालल्याने सर्वत्र पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
ग्रामीण भागात कोरूना बाधीतांची संख्या तुरळक प्रमाणात आढळत होती. मात्र गेली चार दिवस तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढ चाललेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत करवीर तालुक्यामध्ये कोरोना चा विळखा अधिकच घट्ट होत गेला असल्याचे आजच्या कोरुना बाधितांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे.
दिवसभरात 27 रुग्ण
करवीर तालुक्यातील निगवे खालसा कसबा बीड वाकरे मोरेवाडी शिंगणापूर बहिरेश्वर कोगे कळंबा चिंचवाड गांधीनगर पाचगाव आरे या गावांमधून दिवसभरात तब्बल 27 रुग्णांना कोरोणाची बाधा झालेली आहे.
निगवे खालसा ची संख्या 15 वर
निगवे खालसा येथे कोरोना रुग्णांची संख्या 15 वर पोहोचलेली आहे त्यापैकी चार रुग्ण बरे झाले असून 11 रुग्णावरती उपचार सुरू आहेत गावातील स्थानिक डॉक्टर व त्यांचे कुटुंबाला बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे ग्रामपंचायतीच्या दक्षता समितीने कोरोना बाधित डॉक्टरांच्या संपर्कातील आलेल्या सर्व नागरिकांची यादी तयार करून त्यांना घरीच कोरं टाईन केलेले आहे इस्पुरली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वे केला जात आहे ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्राकडून युद्धपातळीवर यंत्रणा उभी केली आहे कोरूना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता समितीकडून तब्बल पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करून गाव लॉकडाऊन केलेले आहे. दूध संकलन औषध दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व व्यवहार ठेवलेले आहेत.
Previous Articleलेनोवोचा 7 आय स्लिम लॅपटॉप दाखल
Next Article सांगली जिल्हय़ात 12 जणांचा मृत्यू, 209 रूग्ण वाढले









