प्रतिनिधी / करमाळा
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगी संस्थेची महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन मार्फत सबएजंट म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संचालक सुजीत बागल यांनी दिली आहे.
सध्या मूग, उडीद व सोयाबीनची नोंदणी सुरु असून शेतकऱ्यांनी ७ बारा ८ अ (पिकपाणी नोंदी सह ), बँक पासबुक, आधार कार्ड यासह नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे सचिव आजीनाथ मोरे यांनी केले आहे. नोंदणी व संपर्कासाठी शेतकऱ्यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील सोलापूर जिल्हा मध्य. सह बँकेच्या शेजारील संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. मुग प्रतिक्विंटल ७१९६ रु, उडीद प्रति क्विंटल ६००० रु. व सोयाबीन प्रति क्विंटल ३८८० रु. हमीभाव जाहीर झाला आहे.
करमाळा तालुक्यासाठी मार्केटींग फेडरेशन मार्फत श्री विठ्ठल सर्वसाधारण संस्था मर्या मांगी या संस्थेची सबएजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संस्थेशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतक ऱ्यांनी नोंदणी करावी व हमी भाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही सुजीत बागल यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









