वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
प्राप्तिकर विभागाकडून एका आठवडय़ात जवळपास 10.2 लाख करदात्यांना एकूण 4,250 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) दिली आहे. अर्थमंत्रालयाकडून मागील आठवडय़ात म्हटले होते, की पाच लाख रुपयापर्यंतचा कर परतावा लवकरात लवकर देणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे कोविड 19 च्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत असणाऱया जवळपास 14 लाख व्यक्तिगत आणि व्यापारी करदात्यांना हा परतावा दिला जाणार असल्याचे म्हटले आहे.
14 एप्रिल 2020 पर्यंत 10.2 लाख करदात्यांना 4,250 कोटी रुपयांचा परतावा दिला असल्याचे एका अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे. चालू आठवडय़ात जवळपास 1.75 लाख आणखीन परतावा देण्यात येणार आहे. सीबीडीटीने म्हटले आहे, की परतावा पाच ते सात या कार्यालयीन दिवसांमध्ये करदात्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे म्हटले आहे. यात वैयक्तिक आणि कंपनी आदीच्या संबंधीत असणारी प्रत्यक्ष कर मंडळ क्षेत्रातील मुख्य सरकारी संस्था आहे. मागील आर्थिक वर्षात एकूण 1.84 लाख कोटी रुपयांचा 2.50 कोटी परतावा दिलेला आहे. तरी विभागाकडे पाठविण्यात आलेल्या जवळपास 1.74 लाख प्रकरणाची करदात्यांना पाठवलेल्या ई मेलवर त्यांच्या प्रतिउत्तराची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.









