हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कमकारट्टी ओव्हरब्रिजजवळ रविवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात होळीनागलापूर (ता. बैलहोंगल) येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
प्रवीणकुमार बानमल जैन (वय 46, रा. होळीनागलापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मोटार सायकलस्वाराचे नाव आहे. केए 24 एक्स 6377 क्रमांकाच्या मोटार सायकलवरून बेळगावकडे येताना बोलेरोला पाठीमागून धडक बसून हा अपघात घडला आहे.
यासंबंधी केए 25 एबी 2452 क्रमांकाच्या बोलेरोचा चालक शिवानंद शिवलिंगाप्पा बडलिंगण्णावर याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









