वार्ताहर / कबनूर
प्राप्त झालेल्या अहवालानुसार कबनूर येथील कुलकर्णी मळ्यात तीन व यशोलक्ष्मी परिसरात एक असे चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. एकूण बाधित संख्या 15 वर जाऊन ठेपली आहे. कबनुर तालुका हातकणंगले येथील गावातील मध्यवस्तीत असलेल्या एका दवाखान्यातील बाधित डॉक्टरांच्या कुलकर्णी मळ्यातील घरासमोरील एकाच घरातील तीन जणांना कोरोना ची लागण झाली आहे. यामध्ये छत्तीस वर्षांचा पुरुष ,बारा वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा या तिघांचा समावेश आहे. कुलकर्णी मळ्यातील डॉक्टरांच्या घरासमोरील एकाच घरातील आठ जणांना तपासणीसाठी अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्वॅब घेण्यासाठी दाखल करण्यात आली होते. दाखल 8 मधील तीन बाधित आहेत. दोन मुलींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर अन्य तीन जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही.
येथून जवळच असलेल्या यशोलक्ष्मी परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. बाधित व्यक्तीच्या घरातील पत्नीला व मुलीला संजय घोडावत विलगीकरण केंद्रात. स्वॅबसाठी दाखल करण्यात आले होते. दाखल केलेल्या बाधित व्यक्तीच्या 55 वर्षीय पत्नीलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दाखल मुलीचे अध्याप अहवाल आलेला नाही. इचलकरंजी शहरात कोरोनाची संख्या वाढतच आहे. शहरालगत असलेल्या कबनूरात आठ दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता परंतु या आठ दिवसात झपाट्याने वाढ होऊन संख्या पंधरावर येऊन ठेपली आहे. गावांमध्ये आणखीन नव्याने चार रुग्ण आढळून आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleसातारा : फाळकूट भाईच्या दारू गुत्यावर पोलिसांचा छापा
Next Article पुणे विभागात कोरोना रुग्ण संख्या 58,098 वर








