प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली येथील कपिलनाथ मंडळाच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक औषध देण्यात आले. डेंग्यूच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांना डेंग्यू व चिकनगुनिया होऊनये यासाठी होमिओपॅथिक औषध मंडळाच्या वतीने देण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या औषधाचा लाभ घेतला.
डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रोहन अरभावी यांनी नागरिकांना औषध वितरण केले. यावेळी कपिलनाथ मंडळाचे कपिल भोसले, जयशिल मुरकुटे, इंद्रजीत जाधव, सचिन सुर्वे, सुनिल लगाडे, यतेश लगाडे, दीपक पाटील, मोहन नाईक, अशोक बेटगेरी, अभिनंदन परमाज यासह इतर उपस्थित होते.









