वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव एमआयडीसी व कणेरी तालुका करवीर या ठिकाणी आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गोकुळ शिरगाव पोलिसांनी गोकुळ शिरगाव येथील एस. टी कॉलनी व कणेरी येथील माळ विभाग सील केला असल्याचे सपोनि सुशांत चव्हाण यांनी सांगितले. गोकुळ शिरगाव परिसरात चार दिवसापूर्वी येथील दत्त कॉलनी कणेरी मध्ये तीन पॉझिटिव्ह सापडले होते, गोकुळ शिरगाव.
कणेरी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाच झाली असल्याने नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. औद्योगिक वसाहत असल्याकारणाने इथल्या नागरिकांनी केंद्र सरकारने व राज्य सरकारने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या आदेशाचे पालन करून आपले काम करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे .एमआयडीसी ला जाणारा प्रत्येक कर्मचारी मास्क लावूनच कामावर जात असतानाचे पाहायला मिळत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








