प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील गाव कारभारी पदाच्या आरक्षणाची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी काढण्यात आली ही सोडत ग्रामसचिवलयाच्या सन २०२० ते २०२५ या कालावधी करिता आहे. गावकारभाऱ्याची आरक्षण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी गणेश मरकड तहसिलदार डॉ. शैलजा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
त्यात कोणत्या गटास आणि कोणत्या जातीस आरक्षण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कडेगाव तालुक्याची १ लाख ३१ हजार १९८ इतकी लोकसंख्या आहे. त्यानुसार ५४ ग्रामपंचायती पैकी प्रवर्गनिहाय लोकसंख्यानुसार खुल्या गटासाठी ३३ ग्रामपंचायतीचे सरपंच पद असणार असून त्यात १७ महिला असणार आहेत. इतर मागासप्रवर्गासाठी१५ जागा आरक्षित त्यामध्ये ८ महिला असणार आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या ६ जागा पैकी ३महिलासाठी राखीव आहेतयानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली.
यात सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी ३३ जागा असून त्यात खुला सर्वसाधारण १६ तर महिला १७ इतर मागास प्रवर्ग साठी १५ जागा असून सर्वसाधारण ७ व महिला ८, अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी च्या ६ जागा असून त्यात सर्वसाधारण ३ व महिला ३ यांचा समावेश आहे. अशा प्रकारे हे एकूण ५४ ग्रामसचिवलायाचे आरक्षण निघाले यात २६ ग्रामसचिवलयावर सर्वसाधारण तर २८ वर महिलाराज असणार आहे.
या आरक्षणामुळे अनेकांच्या मनसुब्यावरच गाव कारभाऱ्याचे स्वप्नवत असणाऱ्या स्वप्नावर अखेर पाणी पिरले आहे. आरक्षण सोडतीनंतर मिळालेल्या आरक्षणानुसार प्रत्येकाला गांवकारभारी होण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांच्या सहवासात राहतच आपले राजकीय शक्तीची चुणूक दाखवावी लागेल. ग्रामसचिवलयावर जाण्यासाठी आतापासूनच तयारी करुनच गावकारभाऱ्याचे स्वप्न पुर्णत्वास नेता येईल. यासाठी आरक्षित गावकारभाऱ्यात चुरस लागलेली दिसणार आहे.
यामुळे निवडणूकीला अधिक रंग भरणार आहे. तुर्तास मिळालेल्या आरक्षणानुसार फक्त गावकारभाऱ्यात स्पर्धा लागलेली पहावयास मिळेल आता फक्त पाहत बसा ग्रामसचिवलयाच्या निवडणूकीची वाट त्याशिवाय गंत्यतर नाही
गांवनिहाय व जातनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण खुला गट आरक्षण
सोनसळ, आसद, हिंगणगांव बुद्रुक ,उपाळेवांगी, खेराडेवांगी ,कान्हरवाडी,भिकवडी खुर्द,करांडेवाडी, बेलवडे,तुपेवाडी येतगांव,आंबेगाव, शिवाजीनगर, कडेपूर,अंपशिंगे नेर्ली, शिवणी
महिलाआरक्षण
.शिरसगांव,सोनकीरे,वांगी ,मोहित्याचे वडगाव, शिरगाव,बोबाळेवाडी,रायगांव, ढाणेवाडी, येतगांव, वाजेगांव, सासपडे, विहापूर ,रेणुसेवाडी, नेवरी, निमसोड ,खंबाळे औंध, कोतवडे,
इतर मागास प्रवर्ग आरक्षण सर्वसाधारण.खुला गट
पाडळी,चिंचणी,रामापूर, तोंडोली, उपाळेमायणी,शाळगांव,चिखली
महिला आरक्षण
देवराष्टे,कुंभारगांव,कोतिज,येडे,अमरापूर हिंगणगांव खुर्द, तडसर,येवलेवाडी
अनुसुचित जातीचाप्रवर्ग राखीव आरक्षण सर्वसाधारण.
.खेराडे विटा, हणमंतवडिये,
महिला आरक्षण
अंबक, सोहोली, वडियेरायबाग असे गावनिहाय आरक्षण पडले आहे.








