पाटगाव/ वार्ताहर
प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव व पाटगाव अंतर्गत भुदरगड तालुक्यामध्ये सर्व प्रथम आकुर्डे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तालुक्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्यापाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव व पाटगाव अंतर्गत आज पर्यंत एकूण ४६ रुग्ण कोरोना बाधित सापडले यापैकी ३३ रुग्ण कोरोना पासून मुक्त होऊन घरी गेले आहेत.यामुळे या परिसरातील कोरोनाची भिती थोडी-फार कमी होण्यास मदत होणार आहे.
कडगाव व पाटगाव या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आकुर्डे शेणगांव,करडवाडी,पाचर्डे ,दोनवडे, सुख्याचीवाडी,तांबाळे, सुतारवाडी,अंतुर्ली, अंतीवडे,पाळ्याचाहुडा,चाफेवाडी, देऊळवाडी,ममदापूर,नवले या ठिकाणी प्रत्येकी 1,राणेवाडी, वेसर्डे,तिरवडे,वासणोली,या गावांमध्ये प्रत्येकी 2, एरंडपे,शिवडाव व बशाचामोळा प्रत्येकी 3, तर सर्वाधिक प्रत्येकी सात रुग्ण पाटगाव व वेंगरूळ या ठिकाणी सापडले असे एकूण या विभागात ४६ बाधित रुग्ण आढळले होते, यापैकी पाटगाव-५, शिवडाव-३, बशाचामोळा-२,करडवाडी,दोनवडे, पाचर्डे व अंतुर्ली या गावातील प्रत्येकी एक असे १३ रुग्ण सध्या उपचार घेत असून इतर ३३ रुग्णांना उपचारांती घरी पाठवण्यात आले.
Previous Articleताळगांवात शेतकऱयांवर होतो अन्याय
Next Article गावागावात लोकांचे स्वेच्छेने लॉकडाऊन









