ऑनलाईन टीम / मुंबई :
उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. त्या अभिनयासाठी तर नक्कीच ओळखल्या जात नाहीत, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना रानौतने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली होती.
कंगनाच्या टीकेला उर्मिला मातोंडकर यांनी काल रात्री उशिराने उत्तर दिले आहे . उर्मिलाने सोशल मीडियावर एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभ रात्री अशी कॅप्शन देत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सूड माणसाला जाळत असतो, आणि संयमच सुडावर नियत्रंण मिळवण्याचा उपाय असतो.
दरम्यान, कंगनाचे मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा, ड्रग्जवरून बॉलिवूडवर केलेली टीका यााा सर्वांचा उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला होता. त्यालाच उत्तर देत असताना कंगनाने उर्मिला यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटले. यावर आता उर्मिला मातोंडकर यांनी देखील सणसणीत उत्तर दिले आहे.









