बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील कंपनी ओमॅक्सला सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया या कंपनीने जुलै-सप्टेंबर कालावधीत 39 कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 76 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीअखेर कंपनीचे उत्पन्न 191 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 163 कोटींचे उत्पन्न मिळवले होते.









