मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमिक्रोनची लागण होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बूस्टर डोस देण्यावरून चर्चा सुरु असून केंद्राने पुढाकार घ्यावा असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. ते मुंबईत बोलत होते.कोरोनाचे संकट कमी होत असताना पुन्हा एकदा देशात ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमिक्रोनची लागण होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या संकटावर मात मिळवण्यासाठी बूस्टर डोस देण्याची गरज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हंटले आहेत की, “ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच याची बाधा झाल्याचं दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपल्याकडे डोस उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मात्र केंद्रसरकारने पुढाकार घेऊन त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. “बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात”.असे देखील पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ओमिक्रोनच्या परिस्थीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं की नाही हेदेखील पाहिलं पाहिजे”. पण त्याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा स्पष्ट भूमिका केली पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. ओमिक्रोन