ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुण्याच्या जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीने कोरोनावरील लस तयार केली असून, या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही लस ओमिक्रॉनवर विकसित केली असून, त्यासाठी मेसेंजर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे.
कोरोनावरील नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, जीनोव्हा फार्मास्युटिकल्सने ओमिक्रॉनला लक्ष्य करुन दोन डोसची लस आपल्या प्रयोगशाळेत विकसित केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 3000 नागरिकांवर चाचणी केली. या चाचणीचा डेटा औषध नियामकाकडे पाठविण्यात आला आहे. आता कंपनी चाचणीचा तिसरा टप्पा देखील पूर्ण करणार आहे. नव्या लसीला नियामकाकडून मंजुरी मिळण्याचीही शक्यता नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत तयार केलेली लस वाया जाण्याचा धोका आहे. म्हणून लसीचे रिस्क मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आले आहे.
mRNA प्लॅटफॉर्मवर कोरोनाची लस बनवणे ही देशासाठी मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्यानंतर लसीला औषध नियामकाकडून मान्यता मिळू शकेल, असेही पॉल म्हणाले.









