लंडन / वृत्तसंस्था
ओमिक्रॉन व्हेरियंटबाधित पहिल्या रुग्णाचा ब्रिटनमध्ये बळी गेला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एका रुग्णाला प्राण गमावावे लागल्याची माहिती दिली आहे. वेस्ट लंडनमधील पॅडिंग्टन येथे एका लसीकरण सेंटरला भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. ओमिक्रॉन चिंता वाढवत असून या व्हेरियंटची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. सध्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा दक्षिण आफ्रिकेतून सुरू झाली असून आतापर्यंत तो 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. भारतातही सध्या 40 हून अधिक रुग्ण सापडले आहेत.









