मास्क आणि नियमांचे पालन करणे अत्यावश्यक – तज्ज्ञ
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जागतिक स्तरावर फैलावणारा कोरोनाचा नवा व्हेरियंटचा वेग पाहता केंद्र सरकार व राज्य सरकारने कोरोना लसीकरण मोहिम अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे लसीकरण केलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ही दिलासादायक बाब असली तरी नविन मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन बाधितांपैकी ५० टक्के रुग्ण हे लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरियंट असणाऱ्या ओमिक्रॉनचा देशात फैलावण्याचा वेग आहे. असाच राहिल्यास देशात संक्रमणाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच एक महत्त्वाची बाब समोर आली आहे कि, १८३ रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर ५० टक्के म्हणजे ८७ रुग्णांनी कोरोनालसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातील तीन जणांनी बूस्टर डोसही घेतले आहेत. ओरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी केवळ लस घेणे पुरे नाही. तर संसर्गाची साखळी थांबवण्यासाठी मास्क आणि कोरोनानियमांचे तंतोतत पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आहे.
ओमिक्रॉन संसर्गामुळे गंभीर लक्षणे उद्भवतातच असे नाही. देशात आतापर्यंत आढळलेल्या एक तृतीयांश प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत, तर इतरांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. म्हणूनच मी यावर जोर देऊ इच्छितो की लक्षणे असलेल्या रूग्णांवर त्याच प्रकारे उपचार केले जाणे आवश्यक आहे. असे ही स्पष्ट करण्यात स्पष्ट केले.