मुंबई
चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने आपला नवा ट्रिपल कॅमेरावाला स्मार्टफोन ओप्पो ए 15 नुकताच लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये इतकी असणार आहे. डायनामिक ब्लॅक आणि मिस्टिक ब्ल्यू या दोन रंगांमध्ये हा फोन दाखल झाला असून 6.53 इंचाच्या वॉटर ड्रॉप स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन एचडी प्लस आहे तर मुख्य कॅमेरा 13 एमपीचा तसेच यात दोन एमपीची मायक्रो लेंस आहे. ज्याने विशेष म्हणजे 4 सेंमीपर्यंतचे क्लोजअप शॉटसही घेता येतात. 2 एमपीचा एक डेप्थ कॅमेराही याला आहे.









