वृत्तसंस्था/ रोम
अमेरिकेच्या रीली ओपेल्काने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना अर्जेन्टिनाच्या फेडरिको डेल्बोनिसचा पराभव केला. मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची ओपेल्काची ही पहिलीच वेळ आहे.
ओपेल्काने डेल्बोनिसवर 7-5, 7-6 (7-2) असा विजय मिळविला. सुमारे पावणेदोन तास ही लढत चालली होती. त्याची पुढील लढत स्पेनचा राफेल नदाल किंवा जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यापैकी एकाशी होईल. नदालने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा 3-6, 6-4, 7-6 (7-3) असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. व्हेरेव्हलाही जपानच्या केई निशिकोरीवर 4-6, 6-3, 6-4 असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. अन्य एका सामन्यात इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोने चौथ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचे आव्हान 6-4, 6-7 (5-7), 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची पुढील लढत आंद्रे रुबलेव्हशी होणार आहे.









