नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
ओडिसामधून तब्बल दीड कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे. गांजा २१ क्विंटल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू वाहनांमधून राज्याबाहेर पाठवण्याच्या तयारीत होते.
या घटनेबद्दल माहिती देताना आर उदयगिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीपकुमार नायक म्हणाले की,आर उदयगिरीमध्ये गजपती पोलिसांनी सुमारे २१ क्विंटल गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारातील किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी २६ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सात महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









