ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
देशात वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेऊन ओडिशा मधील पटनायक सरकारने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी केली.
ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. आम्हाला कोणत्याही परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. दरम्यान, बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ओडिशाने याआधीच दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यानंतर आज बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, ओडिशासह कर्नाटक सरकारने देखील आज बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याआधी हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने देखील बारावीची परीक्षा रद्द केली आहे.