ओटवणे/प्रतिनिधी –
ओटवणे गावातील सर्वात पहिली प्राथमिक शाळा नं १ ही १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त या शाळेच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ बुधवारी २६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे
सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत बापूसाहेब महाराजानी संस्थान काळात ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणासाठी काही ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यात १०० वर्षांपुर्वी ओटवणे गावात सन १९२२ मध्ये या शाळेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाची ही शाळा भूषण आहे. तसेच गावातील ही पहिली शतक महोत्सवी शाळा गावासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.
या शाळेने गेल्या चार पिढ्यात हजारो विद्यार्थी घडविले आहेत. या निमित्त येत्या वर्षभरात कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी विविध भरगच्च कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.