ऑनलाईन टीम / मेलबर्न :
अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही परदेशी पत्रकारांवर निर्बंध आणले आहेत. परदेशी पत्रकारांकडून हेरगिरी तसेच देशाची चुकीची प्रतिमा रंगवली जाणार नाही यावर संघराज्य संस्थांकडून आता देखरेख केली जाणार आहे.
अमेरिकेतील काही चिनी पत्रकारांनी तेथील संस्थांची महत्वाची माहिती चोरल्याचे उघड झाल्याने अमेरिकेने काही दिवसांपूर्वी चिनी पत्रकारांवर निर्बंध घातले होते. त्यानंतर चीनने अशाच प्रकारे इतर देशात आपले हस्तक पाठवून देशाशी संबंधित माहिती चोरल्याचे उघड झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी पत्रकारांची छाननी केली जाईल.
ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणाऱ्या परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलीस विभाग आणि परराष्ट्र विभाग लक्ष ठेवेल. तसेच त्यांच्यावर योग्य कारवाई करेल, असे ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी म्हटले आहे.









