वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रय़ू टायने काही वैयक्तिक कारणास्तव आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. रविवारी त्याने मायदेशी प्रयाण केले.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून माघार घेणाऱया विदेशी क्रिकेटपटूंमध्ये टाय हा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी इंग्लंडचा आर्चरने दुखापतीमुळे तसेच इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आणि लियाम लिविंगस्टोन आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. राजस्थान रॉयल्स संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकराने ऑस्ट्रेलियाचा टाय मायदेशी जात असल्याची माहिती दिली. 34 वर्षीय टायने आपल्या वैयक्तिक कारकीर्दीत सात वनडे आणि 28 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.









