वृत्तसंस्था/ मेलबेर्न
फेब्रुवारी महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱया टेनिसपटूंसाठी स्पर्धा आयोजकांनी एक महिन्याचा कालावधी बाकी असताना क्वारंटाईनसाठी स्थळामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
2021 सालातील ही पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत विविध देशांचे टेनिसपटू ऑस्ट्रेलियात दाखल होत आहेत. या टेनिसपटूंसाठी स्पर्धा आयोजकांनी 14 दिवसांसाठी सक्तीचे क्वारंटाईन करण्याचे ठरविले आहे. मेलबेर्नमधील एक आलिशान हॉटेल क्वारंटाईनसाठी निश्चित करण्यात आले होते. पण हॉटेलच्या अपार्टमेंट मालकांनी स्पर्धा आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याने क्वारंटाईनसाठी आता नवे हॉटेल निवडले जाणार आहे. टेनिस ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी वेस्टीन मेलबेर्नमध्ये टेनिसपटूंकरिता क्वारंटाईनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.









