वृत्तसंस्था/ कॅनबेरा
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघामध्ये होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाज मेगन स्कटचे पुनरागमन झाले आहे.
आयसीसीच्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत स्कट सध्या तिसऱया स्थानावर आहे. मात्र इंग्लंडविरूद्धच्या एकमेव कसोटीसाठी तिला वगळण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया संघ- ब्राऊन, कॅरे, कँपबेल, डार्लिंग्टन, गार्डनर, हेन्स, ऍलीसा हिली, जोनासेन, ऍलेना किंग, लेनिंग (कर्णधार), मॅकग्रा, मुनी, पेरी, स्कट आणि सुदरलँड.









