ऑनलाईन टीम / मणिपूर :
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने मणिपूर पोलिसांत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (क्रीडा) म्हणून पदभार स्वीकारला आहे. चानू यांनी आज ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.
मीराबाई चानू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मणिपूर पोलिसात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) म्हणून दाखल होणे हा माझा सन्मान आहे. मला देशाची आणि नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी मणिपूर राज्य आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचे आभार मानते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वजनी वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक जिंकणारी मीराबाई ही भारताची पहिली महिला ऍथलीट आहे. गेल्या वर्षी जपानमधील टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मीराबाईला अतिरिक्त पोलिस अधीक्षक (क्रिडा) बनवल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आज पदभार स्वीकारल्यानंतर मीराबाईने मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांना सॅल्यूट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.









