अतुल रावराणेंची माहितीः 100 विद्यार्थी पुरस्कृतः आठही तालुक्यात लवकरच कार्यालये
प्रतिनिधी / वैभववाडी:
वैभववाडी येथील भैरी भवानी प्रति÷ान जिह्यात शेती, शिक्षण, स्वयंरोजगारावर विशेष लक्ष केंद्रीत करून काम करणार आहोत. तालुक्मयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑलिंपियाड परीक्षा देता यावी, यासाठी 100 विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले असल्याची माहिती भैरी भवानी प्रति÷ानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिली.
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावराणे बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शहरप्रमुख प्रदीप रावराणे, संदेश पटेल, दीपक कदम, महेश रावराणे आदी उपस्थित होते. सध्या देशावर कोरोनाचे संकट असून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी केंद्र शासन एनसीईआरटी मान्यता प्राप्त सीएससी ऑलिंपियाड ही स्पर्धा परीक्षा घेते. या स्पर्धेत तालुक्मयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी मिळावी. यासाठी भैरीभवानी प्रति÷ानच्यावतीने शंभर विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरली आहे. या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. त्यांना सृजनशिलतेचे आकलन होते. नाविन्यपूर्ण विचारांची प्रेरणा मिळते. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. त्यांचा कल पालकांना लक्षात येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षा ऑनलाईन होणार
ही स्पर्धा परीक्षा तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. याची फी 125 रुपये असून ऑगस्टमध्ये परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थी त्याच्या घरातूनही परीक्षा देऊ शकणार आहेत. हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. यासाठी भैरी भवानी प्रति÷ानने पुढाकार घेतल्यामुळे आम्ही वैभववाडीपासून या उपक्रमाची सुरुवात करीत आहोत, अशी माहिती सीएससी ऍकॅडमीचे सुयोग दीक्षित व प्रसाद जाधव यांनी दिली.
चाकरमानी तरुणांनी शेतीकडे वळावे
भैरी भवानी प्रति÷ानची जिह्यात प्रत्येक तालुक्मयात कार्यालये सुरू करणार आहे. या कार्यालयातून शेतकऱयांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शहरातील रोजगार धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अशावेळी बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे. चाकरमानी तरुण मोठय़ा संख्येने गावाकडे आला आहे. या तरुणांनी नोकरीच्या पाठी न लागता गावातील शेतीकडे वळावे. यासाठी प्रति÷ान प्रयत्न करणार आहे, असे रावराणे यांनी सांगितले.
आठही तालुक्यात लवकरच कार्यालये
शासकीय योजनांवरच अवलंबून न राहाता प्रति÷ानच्यावतीने विविध उपक्रमातून शेतकऱयांना प्रोत्साहन व सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. यासाठी जिह्यातील आठही तालुक्मयात लवकरच कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आम्ही खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकाऱयांची मदत घेणार आहोत. राजकारणापलिकडे जाऊन आपण हे काम करणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले.









