वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस संकटामुळे संपूर्ण देश 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या निवासस्थानी राहावे लागत आहे. भारताचा ऑलिंपिक नेमबाज विजयकुमार पालमपूर येथील प्रशिक्षण महाविद्यालयात राहत असून तो सध्या ऑनलाईनद्वारे कायद्याचा अभ्यास करीत आहे.
नेमबाज विजयकुमारने 2012 च्या ऑलिंपिक स्पर्धेत 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक मिळविले होते. त्याला शारीरिक व्यायामाची गरज होती. पण कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण संचारबंदी करण्यात आल्याने तो सध्या ऑनलाईनद्वारे कायद्याचा अभ्यास करीत आहे. हिमाचलप्रदेश पोलीस खात्यामध्ये डीएसपी पदासाठी तो प्रशिक्षण घेत असून या प्रशिक्षणाचा एक भाग असल्याने त्याला कायद्याचा अभ्यास करावा लागत आहे. 15 वर्षे विजयकुमार भारतीय सेनादलात कार्यरत होता. 34 वर्षीय विजयकुमार आता हिमाचल प्रदेश पोलीस खात्यामध्ये डीएसपी पदासाठी प्रशिक्षण घेत आहे.









