वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक क्रीडाग्राममध्ये शनिवारी कोरोनाचे नवे 21 रूग्ण आढळल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. मात्र या रूग्णामध्ये एकाही ऍथलीटचा समावेश नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेमध्ये नवे रूग्ण आढळत असल्याने टोकियो आणि ओसाका या दोन शहरामध्ये आणीबाणी यापूर्वी शासनाकहून जाहीर करण्यात आली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान आता कोरोना बाधितांचा आकडा 241 झाला आहे. नव्याने आढळलेल्या 21 कोरोना बाधित रूग्णांमध्ये 14 जण कंत्राटदार असून अन्य 7 जण या स्पर्धेशी निगडीत अधिकारी आहेत. टोकियो शहरामध्ये नागरिकांच्या दररोज कोरोना चाचणी घेतल्या जातात आणि सलग चौथ्या दिवशी 3000 नवे कोरोना रूग्ण आढळले









