झरमे गावातील महिलांकडून सरकारने उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिनिधी / वाळपई
सध्या गोवा सरकारच्या शिक्षण खात्यातर्फे ऑनलाइन पद्धतीच्या अभ्यासक्रमाचा मोठा बऱयाच प्रमाणात गाजत आहे. सत्तरी तालुक्मयातील जवळपास 30 टक्के गावांमध्ये कोणत्याही कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्यामुळे मुलांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वेगवेगळय़ा स्तरावरून पालकांनी नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
सत्तरी तालुक्मयातील झरंमे गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा नेटवर्क मिळत नसल्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान यांच्या पार्श्वभूमीवर सदर गावातील महिला भगिनी आक्रमक रूप धारण केले असून सरकारच्या ऑनलाइन पद्धतीच्या अभ्यासक्रमा संदर्भाचा मुद्दा यावरून सरकारवर आरोप केले आहेत. गावात महिला भगिनींची एक महत्त्वाची बैठक झाली व सरकारच्या यानिर्णयाविरोधात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात आला.
गावांमध्ये नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या भागातील मुलांना जवळपास चार किलोमीटर अंतरावर जाऊन ऑनलाइन पद्धतीचे अभ्यासक्रमावर लक्ष द्यावे लागत आहे. सध्या पावसाळी मौसम असल्यामुळे अशातच मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याची माहिती याभागातील महिला भगिनींनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पर्ये मतदार संघातील झर्मे गावात टार्वर नसल्याने विद्यार्थ्यांना आनलाईन शिक्षणासाठी माेþाr समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी गावातील महिला तसेच विद्यार्थ्यांनी सरकारने ताबडतोब टावर बसवावा अशी मागणी केली आहे. गावातील महिला व विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन गावात टावर बसवावा अशी मागणी केली आहे. झर्मे गावात गेली अनेक वर्षे माेबाईल नेटवर्क मिळत नाही. जर काेणालाही फाेन करायचे असेल तर गावापासून तीन किलोमीटर पुढे यावे लागते त्यामुळे गावातील लाेकांची गैरसोय होते. सरकारने आनलाईन शिक्षण सुरू केले आहे पण गावात टावर नसल्याने माेबाईल नेटवर्क मिळत नाही त्यामुळे सध्या विद्यार्थी आनलाईन शिक्षणापासून दुरच राहिला आहे गावातील रुक्मिणी गावस व लक्ष्मी गावस ह्या महिलांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना जावे लागते तीन किलोमीटर
झर्मेतील विद्यार्थ्यांना आनलाईन शिक्षणासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते. नेटवर्क मिळत नसल्याने दाेन तास रस्त्यावर उभे रहावे लागते. मुलींना तर अनेक समस्या येत आहेत त्यात समाजाची निंदा ऐकून घ्यावी लागते. त्यासाठी झर्मे गावात ताबडतोब टावर बसवावा अशी मागणी अनिता गावस, सिमरन गावस ह्या विद्यार्थीनीनी सांगितले.
चार मुलाचे शिक्षण कसे करावे? पालकांना प्रश्न
गावातील एका कुटुंबातील तीन ते चार मुले असतात त्यावेळी चारही मुलांना माेबाईल कसा पुरवावा असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे पालकांसमोर संकटं उभे राहिले आहे. स्मार्ट फोनची किंमत पंधरा हजार पेक्षा जास्त आहे. चार मुलांना माेबाईल घेऊन द्यायचे म्हणजे पालकांना कसे शक्मय आहे त्यासाठी सरकारने दुसरा ताेडगा काढावा अशी मागणी पालक करीत आहे.
टावरसाठी प्रयत्न करीत असल्याचे सरपंचाचे आश्वासन
झर्मे गावात टावर नसल्याने आनलाईन शिक्षणाला मोठी समस्या निर्माण होत आहे त्यासाठी लवकरच टावर व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहे असे म्हाउस पंचायतीच्या सरपंच वंदना गावस हिने सांगितले. त्या म्हणाल्या की यापुर्वी टावर झाला असता पण काही अडचणी निर्माण झाल्याने टावर हाेण्यास विलंब झाला पण आता प्रयत्न सुरू केले असून लवकरच हाेईल अशी आशा आहे.









