प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय आता संपामधून माघार नाही, अशी रोखठोक भूमिका संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱयांकडून घेण्यात आली आह़े मागील 2 महिन्यापासून संपावर असलेल्या कर्मचाऱयांचे निलंबन व बडतर्फीची कारवाई शासनाकडून करण्यात आल़ी यापुढे कितीही कारवाई केली तरी आता माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱयांनी ‘तरूण भारत’जवळ बोलताना व्यक्त केल़ी
जिह्यामध्ये रविवारीही एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 750 कर्मचारी हजर झाले आहेत़ यामध्ये 87 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचाही समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 273 प्रशासकीय, 202 कार्यशाळा, 77 चालक, 68 वाहक, 43 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
20 हजाराहून अधिक प्रवाशांचा एसटीतून प्रवास
एसटीच्या दरदिवशी चालणाऱया फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े रविवारी एकूण 20 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े यातून एसटीला सुमारे 5 लक्ष रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आह़े पुढील काही दिवसात आणखी कर्मचारी हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े









