प्रतिनिधी / रत्नागिरी
शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून रत्नागिरी शहर बस सेवा ही अखेर आजपासून सुरू झाली आहे. गेले अनेक दिवस शहर बस सेवा सुरू होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अखेर ही सेवा सुरळीत करण्याचा निर्णय महामंडळ च्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शहर बससेवा वेळापत्रक नियोजन करण्यात आले असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे.
मात्र या बसेस टप्याटप्याने सोडल्या जाणार आहेत. आज काही ठराविक फेऱ्या सोडल्या गेल्या प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याने हळूहळू हो सेवा पूर्ववत करणयात येईल अशी माहिती रत्नागिरी आगाराकडून देण्यात आली. पूर्वी 50 गाड्या दररोज सोडल्या जात होत्या आता शाळा वगैरे बंद असल्याने या गाड्या निम्म्यावर आणण्यात आले आहेत. बस मध्ये प्रवास करताना मास्क वापरणे सक्तीचे असून सॅनिटायजरचा वापर ही केला जात आहे.