शिराळा / वार्ताहर
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना पद निहाय ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करून राज्य शासनात सर्व कर्मचार्यांचे विलीनीकरण व्हावे, राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद कायमस्वरूपी करण्यात यावी.