मुंबई / प्रतिनिधी
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शनिवारी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजप नेते आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्यात चर्चेची फेरी झाली.
ही बैठक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघावा म्हणून सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली आहे. भाजप आमदार, एसटी कर्मचारी आंदोलकसुद्धा या बैठकीत सामील झाले होते. सरकारने तातडीने विलीनीकरणाचा निर्णय होऊ शकत नाही. अशी भूमिका आतापर्यंत लावून धरली असून प्रदीर्घ काळ याच विषयाभोवती चर्चा फिरत राहिली. दोन्ही बाजूंच्या मध्ये काही सुवर्णमध्य काढावा अशा भूमीकेपर्यंत ही बैठक पोहोचली असल्याचे समजते. भाजप नेते आणि परिवहन मंत्री यांच्यामध्ये सध्या व्यक्तिशः चर्चा सुरू असून काय म्हणतात याबाबत काय घोषणा केली जाते. याकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.