बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा थांबल्या आहेत. राज्यात २१ जूनपासून एसएसएलसी परीक्षा सुरु होणार आहे. दरम्यान परीक्षांसाठी फक्त १८-२० विद्यार्थ्यांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात येईल, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सांगितले. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ त्यानुसार प्रश्नपत्रिकांचे बंडल पाठवेल. गुरूवारी बेंगळूर उत्तर, दक्षिण व ग्रामीण भागातील सार्वजनिक सूचना उपसंचालक व गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कुमार बोलत होते. गेल्या वर्षीपासून देशात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडथळे येत आहेत.