९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ए प्लस ग्रेड; २ दिवस घेण्यात येणार परीक्षा
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने बारावीची परीक्षा रद्द तर १० वी ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी याविषयी निर्णय जाहीर केला होता. दरम्यान एसएसएलसी परीक्षेविषयी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने (केएसईईबी) एसएसएलसी परीक्षा मार्गदर्शक तत्वे अंतिम केली आहेत. ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ९० ते १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ए प्लस ग्रेड, ८०-८९ A ग्रेड श्रेणी, ६०-७९- ग्रेड श्रेणी आणि ३५ ते ५९ च्या सी-ग्रेड श्रेणी देण्यात येणार आहे.
मागील वर्षापेक्षा यावर्षी एसएसएलसीची परीक्षा फक्त दोन दिवस घेण्यात येईल. एकत्रित प्रश्नपत्रिकेसाठी एकूण १२० गुण लिहितील. यामध्ये विज्ञान, समाजशास्त्र आणि गणितविषयांचा एक पेपर आणि भाषा विषयाचा (प्रथम, द्वितीय आणि तृतीय) एक पेपर आहेत. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एक दिवसाच्या अंतराने पहिला आणि दुसरा पेपर घेण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त, प्रत्येक विषयात ४० गुण असतील. मूल्यमापनाच्या उद्देशाने, या गुणांना प्रति विषय ८० गुणांमध्ये रुपांतरित केले जाईल. अंतर्गत मूल्यांकन गुण जोडले जातील आणि जास्तीत जास्त ६२५ गुणांसाठी निकाल निश्चित केला जाईल. परीक्षाही बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेतली जाणार आहे.
१४,९२७ शाळांमधील सुमारे ८,७६,५९५ विद्यार्थ्यांनी (६,२४७ विनाअनुदानित शाळांसह) एसएसएलसी पेपर देणे अपेक्षित आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “यावर्षी, प्रत्येक परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त १०० विद्यार्थ्यांसह ३ हजारवरून ६ हजार दुप्पट केली जातील आणि १२ विद्यार्थ्यांसाठी फक्त एक खोली असेल. दरम्यान परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार म्हणाले की, परीक्षा जुलैच्या तिसर्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे.