प्रतिनिधी / मिरज
पक्षविरहित काम करून तसेच सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांना एकत्रित करुन एस.टी. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणार आहोत. त्यांच्या इतर प्रश्नांबाबत तसेच वेतनासंबंधी आंदोलन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने टप्प्या टप्प्याने होणारा एस. टी महामंडळाचा खासगीकरणाचा डाव उधळून लावणार असल्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.
मिरज आगारातील वाहतूक नियंत्रक डी. डी. पटेल यांची सेवा पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी डी. पी. बनसोडे होते.
यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोट्यावधी किंमतीच्या हजारो एकर जागा व मालमत्ता हडपण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे मत व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








