नवी दिल्ली
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी)व्यवस्थापकीय संचालकपदी मिनी आईप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार 2 ऑगस्टपासून सांभाळायला सुरूवात केली आहे. मिनी आईप यांनी आंध्रा विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून 1986 साली त्यांनी ‘एलआयसी’मध्ये थेट भरती अधिकारी म्हणून सेवेस सुरूवात केली होती. व्यवस्थापकीय संचालकपद मिळण्यापूर्वी त्यांनी विविध स्तरावर उत्तम कार्य केलं आहे. हैदराबाद येथील एलआयसीच्या पहिल्या महिला झोनल प्रमुख, कार्यकारी संचालक, संचालक व सीईओ अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. एलआयसीएचएफएल फायनान्शीयल सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्यवसायाची आपल्या कार्यकाळात भरभराट करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.









