महाराष्ट्रातील नागरिकांना मानसिक आरोग्य समुपदेशानासाठी उपक्रम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना साथीचा भारतीयांच्या मानसिक आरोग्यावर फार मोठा विपरीत परिणाम झाला असून अनेकांना असुरक्षित, जोखमीच्या स्थितीत असल्यासारखे वाटू लागले आहे. यातून चिंता व मानसिक तणाव याच्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय आरोग्याच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम पॉवरने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत भागीदारी करून नागरिकांना 24 तास उपलब्ध असलेला आणि बीएमसी एमपॉवर वन ऑन वन या नावाने ओळखला जाणारा 1800120820050 या टोल फ्री हेल्पलाईन नंबर नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व शहरातील नागरिकांना मोफत उपलब्ध असलेल्या या हेल्पलाईनमध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्य समुपदेशकांचा समावेश आहे. हे सगळे एमपॉवर -द सेंटर, एमपॉवर-द फौंडेशन आणि एमपॉवर द सेल येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट असून ते मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन आणि पाठबळ पुरवणार आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारच्या चिंताना संबोधित करण्यासाठी ही सेवा मराठी, हिंदी, इंग्रजीत उपलब्ध असणार आहे. तरी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन एमपॉवर च्या संस्थापक अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी केले आहे.
गेल्या महिनाभरात एमपॉवरला चिंता, तणाव, निराशा, संभ्रमविकृती यांसारख्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे. या समस्यांना संबोधित करण्यासाठी एमपॉवर टेलिफोनवरील संभाषणे, ऑनलाइन चॅट, व्हिडिओ कॉलिंग यासारख्या माध्यमातून लोकांना या टप्प्यातून पार होण्यासाठी समुपदेशन आणि उपचार पुरवत आहे. त्याच बरोबर एमपॉवर पालक, तरूण व्यावसायिक आणि कुटुंबांना रोजच्या परिस्थितीची अधिक चांगली हाताळणी करण्यासाठी आरोग्यविषयक सल्ले आणि टिप्सही देण्यात येणार आहे.









