नवी दिल्ली
मसाला क्षेत्रातील कंपनी एमडीएचची विक्री होणार नसल्याचा खुलासा बुधवारी कंपनीने केला आहे. एमडीएचची खरेदी हिंदुस्थान युनिलिव्हर करणार असल्याची माहिती बाहेर पडल्यानंतर याबाबतचा खुलासा कंपनीने केला आहे. एमडीएचने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर लोकांना सदरच्या अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले आहे. सदरची एमडीएच विक्रीची बातमी खोटी असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.









