गोडोली / प्रतिनिधी
संकटानंतर नेहमीच नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तशीच संधी कोरोनाच्या संकटातून ऑनलाईन शिक्षणाची निर्माण होत आहे. ‘रयत’च्या तज्ञ प्राध्यापकांनी एमएचटी-सीईटी परीक्षेचा आँनलाईन सराव लिंक तयार करून १२ वी नंतर भविष्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची चिंता कमी केली आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन असून शाळा कॉलेज बंद आहेत. इ.१२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेसंबधी पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील,सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मॉक एम.एच.टी. सी.ई.टी.च्या सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थी ही सराव परीक्षा कोठूनही व केव्हाही मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर च्या साह्याने इंटरनेटच्या मदतीने देऊ शकणार आहेत.अनुभवी तज्ञ प्राध्यापकांकडून सराव परीक्षेचे मॉडेल तयार करण्यात आले आहे.
https://mockcet.kbpcoes.in/ या लिंकवर ती उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या लॉक डाऊनच्या काळात अभ्यास व सराव करता येणार आहे. फिजिक्स,मॅथ्स , बायोलॉजी,केमिस्ट्री या विषयावर महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे ही सराव परीक्षा दिल्यामुळे मुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,”असे आवाहन प्राचार्य डॉ. ए.सी.आत्तार.आणि प्राचार्य डॉ.कानडे यांनी केले आहे