प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव येथील संकल्प योग केंद्राच्यावतीने व एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल यांच्यावतीने विद्यार्थी आणि पालकांसाठी तीन दिवशीय योग शिबिर गुगल मीटद्वारे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रत विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी योग शिक्षिका अरती संकेश्वरी व गायत्री चौगले यांनी प्रात्यक्षिके व वेगवेगळी आसने यांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक, शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्यावतीने दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे घरीच कसे योग करायचे, याचे ज्ञान विद्यार्थी व पालकांना देण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य व शैक्षणिकदृष्टय़ा याचा फायदा झाला.
एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचे व्यवस्थापनाचे सदस्य मा. एस. वाय. प्रभू सर, मा. दिमांगी प्रभू मॅडम, मुख्याध्यापिका वृंदा जीनराळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाने हे शिबीर यशस्वी करण्यात आले.









