कोरोनाचा वाढता संसर्ग, लॉकडाऊनचा प्रभाव- काही कंपन्यांचे रेटिंग वधारल्याचीही नोंद
वृत्तसंस्था/ बई
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये कंपन्यांच्या रेटिंगवर प्रभाव होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये एकूण 1,019 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. तर 274 कंपन्यांचे रेटिंग सुधारले आहे. रेटिंग घटलेल्या कंपन्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक राहिल्याचा अंदाज आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार यामध्ये सर्वाधिक घट कॅपिटल गुड्स-नॉन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट क्षेत्रातील कंपन्यांची झाली आहे. यामध्ये एकूण 216 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे तर 62 चे रेटिंग सुधारले आहे. कंझ्युमर डय़ुरेबल आणि अपॅरल म्हणजे महागडे सामान आणि कपडय़ाच्या क्षेत्रातील 119 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे.
टेक्सटाइल्समधील जवळपास 82 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. 18 कंपन्यांच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाल्या आहेत. म्हणजे याचा थेट अर्थ असा आहे, की घरात बहुतांशजण बंदीस्त असल्यामुळे कपडय़ाची मागणी घटली आहे. मागील जवळपास 14 ते 15 महिन्यांपासून लोक घरांमध्ये लॉकडाऊनच्या कारणास्तव बंद आहेत. यामुळे कपडय़ाची मागणी कमी झाली आहे. औषध क्षेत्रात मात्र तेजी कायमची राहिली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटवरही प्रभाव
हॉटेल आणि रेस्टॉरंट सलगपणे बंद असल्यामुळे या क्षेत्रावरही काहीसा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये एकूण 12 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. ज्यामध्ये रिटेलिंग क्षेत्रातील 91 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. कंस्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग म्हणजे बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील एकूण 103 कंपन्यांनीही घट नोंदवली आहे.
धातू व खाण क्षेत्रातील कंपन्या
धातू आणि खाण क्षेत्रातील जवळपास 53 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. तर 15 कंपन्यांचे रेटिंग सुधारले आहे. स्टील क्षेत्रातील कंपन्यांनी घट नोंदवली आहे.यामध्ये एकूण 41 कंपन्यांचे रेटिंग घटले आहे. तर 13 कंपन्यांच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. आयटीमधील 10 कंपन्यांचे रेटिंग वधारले आहे. फायनान्शिअलसह बँकिंग आणि या क्षेत्रातील अन्य कंपन्यांमधील 3 चे रेटिंग वधारले आहे तर 21 चे रेटिंग घटल्याची नेंद केली आहे.









