तिसरे रेल्वे गेटचे काम संथगतीने : कामाची गती वाढवण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सदर काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असून रेल्वे मार्गादरम्यानचा 180 फुटी स्पॅन अद्याप ठेवण्यात आला नाही. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची शक्मयता कमी आहे.
शहरात असलेल्या रेल्वे फाटकावर वाहनांची गर्दी होत असून रेल्वे मार्गाची संख्या वाढली आहे. सध्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वेगाडय़ांची संख्या वाढविण्यात येणार आहे. रेल्वे फाटकावर होणाऱया गर्दीमुळे वाहनधारकांना धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचे काम सुरू करून तीन वर्षे होत आली. पण अद्याप काम अर्धवट आहे. रेल्वे मार्गादरम्यान 520 टनाचा 180 फूट लांबीचा स्पॅन बसविण्याचे काम झाल्यानंतर महिन्याभरात उड्डाणपूल खुले करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदाराने दिले होते. एप्रिल अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
रेल्वे मार्गादरम्यानचे स्पॅन तयार झाले आहे. मागील आठवडय़ात स्पॅन पुलावर बसविण्यात येणार होते. पण अद्यापही बसविण्यात आले नाही. सध्या हे काम संथगतीने सुरू असून स्पॅन बसविण्यास आणखीन आठवडा लागण्याची शक्मयता आहे. स्पॅन बसविल्यानंतरच पुढील कामे मार्गी लागणार आहेत. स्पॅन बसविल्यानंतर काँक्रीट घालून रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच रॅम्पचे काम अद्यापही अर्धवट असल्याने रॅम्पचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाचे काम महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्मयता धूसर बनली आहे. एप्रिल महिन्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून रस्ता खुला करण्याची शक्मयता कमी असल्याचे दिसून येत आहे. महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. पण सध्या कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम लांबण्याची शक्मयता आहे.