वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कांदा पिकाला बसला. त्यातच परतीचा पाऊस लागला यामुळे कांदा उत्पादन कमी झाले. त्यामुळे मागच्या आठवडय़ात कांदा दर वाढले होते. त्यामुळे देशवासियांचे अर्थिक बजेट कोलमडले. याचा परिणाम केंद्र शासनाने याची दखल घेत कांदा व्यापारी वर्गाला कांदा 25 टनापर्यंत शिल्लक ठेवण्यापर्यंत मर्यादा आणली. त्यामुळे देशातील विशेष करून महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील कांद्याचे सौदे बंद आहेत. त्यामुळे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक वाढली जावक थंडावली त्यामुळे कांदा दरात 1000 पासून 1200 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी आणि व्यापारी असोसिएशन अनध्यक्ष विकी (महेश) सचदेव यांनी दिली.
बाजारातील कांदा आवक 40 ट्रक इतकी होती. यामध्ये महाराष्ट्रातून 30 ट्रक जुना कांदा तर कर्नाटकमधून 10 ट्रक कांदा आवक यामध्ये 5 ट्रक नविन कांदा आवक होती. नविन कांदा 1000 रु. तर जुना कांदा 1200 रु. कमी झाला.
नविन कांदा
500 पासून 4000 पर्यंत
जुना कांदा
1000 पासून 6000 रु. असा झाला.
बाजारात मागील बाजारापैकी 3 ट्रक कांदा परदेशातील इजिप्तचा कांदा आवक शिल्लक होता. त्याचा भाव 3000 ते 4500 असा झाला. हा कांदा 1500 रु. कमी झाला असल्याची माहिती लेखापाल सुधिर धामणेकर यांनी दिली.
बाजारात बुधवारी 19 ट्रक परराज्यातील बटाटा आवक होती. त्यापैकी इंदोर 8 ट्रक, आग्रा 3 तर पुणा परिसरातील तळेगावचा 3 ट्रक बटाटा बाजारात विक्रीसाठी आला होता. यामध्ये इंदोर आग्रा बटाटय़ाचे भाव स्थीर होते. तर तळेगावचा बटाटा 200 रु. कमी झाला. असल्याची माहिती बटाटा व्यापारी दिपक (राजदीप) पाटील यांनी दिली.
परराज्यातील बटाटय़ाचे दर
इंदोर 3400 ते 3800
आग्रा 3200 ते 3500
पुणा-तळेगाव 3200 ते 3500
बाजारात जवारी बटाटा आवक 1500 पिशव्या इतकी होती. तसेच परराज्यातील बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात वाढली याचा परिणाम जवारी बटाटा दरात 800 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी गजानन देसूरकर यांनी दिली.
बटाटय़ाचे दर (स्थानिक)
गोळी 1000 ते 1200
गुल्टा 1500 ते 2200
मध्यम 2800 ते 3000
गोळा सफेद 3000 ते 3500
चांगला प्रतीचा लाल मातीतील गोळा बटाटा 3500 ते 4700 रु.









