प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील सुरक्षा आणि शांती आबादीत राखण्यासाठी पोलीस खात्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. दहशदवादापासून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी गोवा पोलीस खात्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी केंद्रीय सुरक्षा गार्डचे मेजर जनरल रानडे यांची भेट घेतली. रानडे शुक्रवारी गोव्यात आले होते. पुढील महिन्यात मॉकड्रील आयोजित करून सुरक्षा व्यवस्थेची देखभाल केली जाणार आहे.









