ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात देशभरात तीव्र आंदोलने सुरू आहेत. मात्र, अद्याप देशात एनआरसी लागू करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे गृहमंत्रालयाने आज लोकसभेत सांगितले.
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत का? याबाबत राज्य सरकारांशी चर्चा झाली आहे का? अशी विचारणा चंदन सिंह आणि नागेश्वर राव या खासदारांनी लोकसभेत सरकारला केली.
या प्रश्नाला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबत लोकसभेमध्ये लिखित उत्तर दिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. या प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर देणार होते. मात्र, सभागृहातील गोंधळामुळे ते शक्य झाले नाही.









