प्रतिनिधी/ रत्नागिरी
एटीएमबाबत माहिती विचारून वृद्धाला सुमारे 39 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समार आला आह़े अच्युत बाळकृष्ण पाटणकर (66, ऱा मिरजोळे रत्नागिरी) असे या वृद्धाचे नाव असून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युत यांच्या मोबाईलवर 4 मे रोजी संशयित आरोपी याने फोन करून एटीएमबद्दल माहिती विचारली होत़ी तुमचे एटीएम ब्लॉक होणार असून ते टाळण्यासाठी तुमच्या एटीएमची मला माहिती द्या, असे सांगितल़े त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अच्युत यांनी एटीएमचा नंबर व सीव्हीव्ही नंबर सांगितल़ा संशयित आरोपी याला नंबर सांगितला असता अच्युत यांच्या खात्यामधून 39 हजार रूपये वजा झाल़े दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच अच्युत यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.









