नवी दिल्ली
सध्या कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातही हालचाली मंदावल्या असून विक्रीत घट अनुभवायला मिळत आहे. अनेक बिल्डरांचे प्रकल्प सध्या अर्थपुरवठय़ाअभावी रेंगाळले आहेत. यादरम्यान एचडीएफसीने या काळात आर्थिक अडचणीत असणाऱया विकासकरांना वित्तपुरवठा करण्याची योजना आखली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)ने बांधकाम क्षेत्र निधीच्या माध्यमातून बिल्डरांना अर्थपुरवठा करण्याचे ठरवले आहे. तणाव व आर्थिक चणचण भासणाऱया बिल्डरांना यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात मंजुरी मिळाली की, प्रकल्पधारकांना अर्थपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









