वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
कोरोना काळात कोणतेही काम असले की, लोक कमीत कमी घराबाहेर पडत आहेत. यामध्ये बँकेची कामे करावयाची असल्यास विविध अडचणी निर्माण होत आहेत. परंतु याच दरम्यान खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने केवायसी सेवेचा व्हीडीओ स्वरुपात प्रारंभ करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये लोकांना खाते उघडण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही.
व्हीडीओ केवायसीची सेवा हवी असल्यास ग्राहकाचा पॅन नंबर आणि आधारकार्ड गरजेचे असेल. ग्राहकांना या सेवेद्वारे वैयक्तिक कर्जही घेता येणार आहे. ग्राहकांसाठी नवीन उत्पादने तसेच सेवांसाठी अनेक एजलाईन पॉड्सवर काम करत आहे. व्हीडीओ केवायसीची सेवा आता बचत आणि व्यावसायिक आणि वेतन खात्यावर तसेच वैयक्तिक कर्जाच्या खात्यासाठी सुरु करण्यात आली असल्याचे बँकेने सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार व्हीडीओ केवायसी, ग्राहकांची संपूर्ण केवायसी करण्याची सुविधा बँकेने सादर केली आहे. व्हीडीओ केवायसी केल्यानंतर ग्राहक सर्व वित्तीय, केवायसी उत्पादनावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपली कामे करु शकणार आहेत.









